
मुंबईतील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱयांसाठी 45 हजार घरे बांधली जाणार असून तब्बल पाच कोटी चौरस फूट क्षेत्रफळ इतक्या जागेवर हाऊसिंग टाऊनशिप उभारली जाणार आहे. पोलीस स्टेशन आणि कार्यालयापासून जवळ घर देण्याचा प्रयत्न राहणार असून या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 100 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. हा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाद्वारे सुमारे पाच कोटी चौरस फूट क्षेत्र विकसित करण्यात येणार असून या प्रकल्पासाठी सुमारे 20 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.































































