
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढला आहे. अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जमीन आणि समुद्रातून हल्ला करणारे एक हजार ड्रोन आणि क्षेपणास्त्र सज्ज असल्याचा इशारा इराणने दिला आहे. अमेरिकेच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांना ते नष्ट करू शकतात, असे इराणने म्हटले आहे.
दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अणू करारावर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव टाकला होता. अमेरिकेच्या युद्धनौका इराणच्या दिशेने जात असल्याचे ट्रम्प यांनी इराणला इशारा देत म्हटले होते.
























































