गोमांस विकून रामराज्य आणणार काय? अविमुक्तेश्वरानंद कोपले

बातमी शेर करा :
सामना फॉलो करा

गोमांस विकून मिळालेल्या डॉलरने रामराज्याची स्थापना होणार नाही, तर गोमातेच्या पायांखालची माती कपाळाला लावल्याने रामराज्य स्थापन होईल, असे म्हणत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गायीला राजमाता घोषित करून हिंदू असल्याचे प्रमाण देण्याचे आव्हान दिले.

अडीच हजार वर्षांच्या इतिहासात प्रथमच एखाद्या शासकाने शंकराचार्य असण्याचा पुरावा मागितला. मी प्रमाण दिले, असे नमूद करताना देशभरातील 40 टक्के गोमांस निर्यात ही उत्तर प्रदेशातून होते. ती 40 दिवसांमध्ये थांबवून दाखवा तेव्हाच आम्ही तुम्ही हिंदू असल्याचे मान्य करू. अन्यथा लखनऊला येऊन तुम्हाला कालनेमि म्हणू, असे त्यांनी सांगितले.