
हैदराबादमध्ये सध्या ‘विंग्स इंडिया 2026’ शो सुरू आहे. या शोमध्ये विविध पुरस्कारांची घोषणा झाली. दिल्ली विमानतळ ‘बेस्ट एअरपोर्ट’ ठरले आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला ‘आत्मनिर्भर भारत’ म्हणून सन्मानित करण्यात आले. एक कोटी प्रवासी श्रेणीत लखनऊ आंतरराष्ट्रीय विमानतळाला बेस्ट एअरपोर्टचा पुरस्कार मिळाला. याशिवाय बिहारलाही पुरस्कार मिळाला आहे. इंडिगो ‘बेस्ट एव्हिएशन कंपनी’ ठरली. नागरी विमान उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्या उपस्थितीत गुरुवारी हैदराबाद येथे आयोजित सोहळ्यात पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
l बंगळुरूच्या कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाला 2.5 कोटींहून अधिक प्रवासी सांभाळण्यासाठी ‘बेस्ट एअरपोर्ट’चा सन्मान मिळाला. l पुणे विमानतळाने वार्षिक 1 ते अडीच कोटी प्रवासी संख्या श्रेणीत अव्वल स्थान मिळवले. l लखनऊ विमानतळाला 50 लाख ते 1 कोटी प्रवासी संख्या श्रेणीत सर्वोत्कृष्ट दर्जा मिळाला. l 50 लाखांपेक्षा कमी प्रवासी संख्या असलेल्या श्रेणीत पोर्ट ब्लेअरच्या वीर सावरकर इंटरनॅशनल एअरपोर्ट हे सर्वोत्कृष्ट ठरले. l राज्य श्रेणीत आंध्र प्रदेशाला ‘बेस्ट स्टेट विथ द डेडिकेटेड आऊटलुक फॉर द एव्हिएशन सेक्टर’ हा सन्मान मिळाला. l एविएशन इकोसिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी बेस्ट स्टेट पुरस्कार तेलंगणा, उत्तराखंड आणि गुजरातला संयुक्तरीत्या जाहीर झाला आहे. l उत्तर प्रदेश आणि बिहारला मोस्ट प्रोऑक्टिव्ह स्टेट पुरस्कार मिळाला. l कर्नाटक आणि महाराष्ट्राला एव्हिएशन स्टेट चॅम्पियनचा पुरस्कार संयुक्तपणे मिळाला.
























































