रोबोटही माणसाच्या मेंदूसारखा विचार करणार, ‘एनविडीया’च्या ‘वर्ल्ड मॉडेल’चा रॉबोटिक जगतात धमाका

बातमी शेर करा :
सामना फॉलो करा

रोबोट काळानुरूप स्मार्ट होऊ लागले आहेत. आता तो दिवस दूर नाही, जेव्हा रोबोट माणसासारखा विचार करून कामाचे नियोजन करू शकेल. रोबोटला नियंत्रित करणारी खास पॉलिसी तयार करण्यात तज्ञांना यश आले आहे. ‘एनविडीया’ने ही कॉसमॉस पॉलिसी सादर केली आहे. याच्या मदतीने रोबोटला कंट्रोल आणि प्लॅनिंग टास्कसाठी तयार केले जाईल. व्हिडीओ प्रेडिक्शन मॉडेल स्वीकारून कोणती कृती करायची, हे रोबोट ठरवू शकेल. त्यापद्धतीचे फ्रेमवर्क डिझाईन केले आहे. रोबोटिक मॅन्युप्लेशनच्या स्टँडर्ड बेंचमार्कवर कॉस्मो पॉलिसीचे निष्कर्ष चांगले आढळून आले आहेत. जिथे दीर्घ काळ विचार करायची वेळ येते, तिथे कॉस्मो पॉलिसीचा सक्सेस रेट चांगला आहे. काही प्रकरणात चांगले काम केले आहे.

रोबोटची पॉलिसीम्हणजे काय?

रोबोटसाठी ‘पॉलिसी’ म्हणजे त्याचा मेंदू, जो काय करायचे याचा निर्णय घेतो. जुन्या रोबोटची ‘पॉलिसी’ ही साधारणपणे खास काम करण्यासाठी बनवण्यात आलेल्या न्यूरल नेटवर्कमध्ये असायची. कॉस्मो पॉलिसी ही खूप वेगळी आहे. यामध्ये रोबोटला पुढे जाऊन काय करायचे आहे आणि त्याचे परिणाम काय होतील, याचा अंदाज घेऊन म्हणजे कॉसमॉस प्रेडिक्ट घेऊन काम केले जाते. अतिरिक्त ट्रेनिंगच्या काळात रोबोटची ऍक्शन, फिजिकल स्टेट, टास्कच्या परिणामांना मॉडेलच्या इंटर्नल टेम्परल रिप्रेझेंटेशनचा भाग मानले जाते. यामुळे वेगवेगळे मॉडेल जोडायची गरज पडत नाही. रोबोटच्या एकत्रित हालचाली, भविष्यातील स्थिती याचा अंदाज लावून कॉस्मो पॉलिसी रचना केली जाते.