
केदारनाथ आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे कधी उघडणार याची घोषणा झाल्यानंतर आता भाविकांसाठी नवीन नियम बनवण्याची तयारी केली जात आहे. बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती (बीकेटीसी) या मुद्दय़ावर लवकरच बैठक घेणार असून भाविकांना मंदिर परिसरात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्याची शक्यता आहे. दोन्ही धामांच्या आत एक मर्यादा निश्चित करण्याची तयारी सुरू आहे. या मर्यादेच्या आत कुणीही फोन वापरताना दिसल्यास त्याला तत्काळ पकडले जाईल. यासाठी परिसराच्या आत लॉकर बनवले जातील. मात्र लॉकर कुठे असेल आणि त्याचे भाडे किती असेल, हे अजून निश्चित झालेले नाही.
























































