
अभिनेता रणवीर सिंहचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. जवळपास 1200 कोटींहून अधिक गल्ला जमवणारा हा चित्रपट शुक्रवारी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला हिंदी, तामीळ आणि तेलुगू या तिन्ही भाषेत प्रदर्शित करण्यात आले आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केलेल्या ‘धुरंधर’ चित्रपटातील जवळपास 10 मिनिटांचे सीन कापण्यात आले आहेत, असा आरोप काही युजर्संनी केला आहे, तर चित्रपटातील काही शिव्या आणि डायलॉग्ससुद्धा म्यूट करण्यात आले आहेत.
























































