
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी राजकीय सन्मानाची सलामी सुरू असताना अचानक मिसफायर झाल्याचा आवाज ऐकू आल्याने उपस्थितांमध्ये काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मात्र या घटनेत कोणताही धोका नव्हता, असे स्पष्ट करत पोलीस प्रशासनाने अफवांना पूर्णविराम दिला आहे.
अजित पवार यांच्यावर राजकीय सन्मानासह अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) तुकडीकडून सलामीदरम्यान तीन राऊंडची हवाई फायरिंग झाल्यानंतर बंदूक खाली आणताना अचानक आणखी एक फायर झाल्याचा आवाज आला. याबाबत एसआरपीएफमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सलामीसाठी नेहमीच ‘ब्लँक राऊंड’चा वापर केला जातो. ब्लँक राऊंडमध्ये बारूद असते, मात्र गोळी नसते.
आरे स्टॉलधारकांचे नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्र दूध वितरक सेनेच्या दिनदर्शिका 2026 चे अनावरण शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. षण्मुखानंद हॉलमध्ये झालेल्या या सोहळ्यात शिवसेना नेते-आमदार भास्कर जाधव, कार्याध्यक्ष राम कदम, कोषाध्यक्ष विलास भुजबळ, सचिव प्रदीप बागायतकर, अमित भुवड, कृष्णा घाटकर आदी उपस्थित होते.
























































