
रन मशीन, किंग यांचे इंस्टाग्राम खाते आज सकाळी काही काळासाठी अचानक गायब झाल्याने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. ‘युजर नॉट फाऊंड’ असा संदेश दिसताच चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आणि काही मिनिटांतच तर्क-वितर्कांचा पाऊस सुरू झाला. मात्र, थोडय़ाच वेळात विराटचे खाते पुन्हा दिसू लागल्याने अखेर चर्चांना पूर्णविराम मिळाला.
आज सकाळी चाहत्यांनी विराटचे इंस्टाग्राम प्रोफाइल तपासले असता खातेच दिसेनासे झाले होते. त्यामुळे विराटने स्वतःचे सोशल मीडिया खाते बंद केले का, अकाउंट डिलीट झाले की हॅक किंवा सस्पेंड झाले आहे, अशा प्रश्नांनी सोशल मीडियावर गोंधळ उडवला. किंग कोहलीचा सोशल मीडियावरील प्रभाव पाहता, ही घटना चाहत्यांसाठी धक्कादायक ठरली.
विराटचे इंस्टाग्रामवर 27 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. अशा प्रचंड फॅन फॉलोइंग असलेल्या सुपरस्टारचे खाते अचानक अदृश्य झाल्याने चाहत्यांची अस्वस्थता वाढली. इतकेच नाही, तर अनेक चाहत्यांनी थेट हिच्या इंस्टाग्राम पोस्टवर जाऊन ‘विराट कोहली कुठे आहे?’ अशी विचारणाही केली.
विराट कोहली हा इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेला क्रिकेटपटू आहे. त्याच्या खात्याला सध्या सुमारे 274 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. या यादीत सचिन सुमारे 51 दशलक्ष फॉलोअर्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट आणि सचिन यांच्यात तब्बल 222 दशलक्ष फॉलोअर्सचा फरक आहे, जो विराटच्या जागतिक लोकप्रियतेची साक्ष देतो.
























































