हिंदुस्थानातील 80 टक्के नोकऱ्या ‘एआय’मुळे धोक्यात; यूएईचे प्रसिद्ध उद्योगपती हुसैन सजवानी यांनी दिला इशारा

बातमी शेर करा :
सामना फॉलो करा

जगाला कुशल मनुष्यबळ पुरवणाऱया हिंदुस्थानसारख्या देशातील नोकऱ्यांना ‘एआय’मुळे मोठा धोका निर्माण होणार आहे. ‘एआय’मुळे देशातील 80 टक्के नोकऱया धोक्यात येऊ शकतात, असा इशारा दुबईतील दिग्गज उद्योगपती हुसैन सजवानी यांनी दिला आहे. ज्या देशांमध्ये आऊटसार्ंसग केलेल्या कामांमुळे मोठय़ा प्रमाणावर नोकऱया निर्माण झाल्या आहेत त्यांना ‘एआय’चा धोका आहे, असे सजवानी यांनी म्हटले आहे.

सजवानी हे दुबईतील डेमाक समूहचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. दावोस येथ वर्ल्ड इका@नॉमिक पह्रममध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी एका मुलाखतीमध्ये ‘एआय’मुळे जागतिक रोजगारावर निर्माण होणारा संभाव्य धोका वर्तवला. ते म्हणाले, एआय तंत्रज्ञानामुळे जॉब मार्केटमध्ये मोठी क्रांती घडणार आहे, मात्र त्याचा फटका जगाला मनुष्यबळ पुरवणाऱया देशांना बसणार आहे. एआयमुळे अकाऊंटंट, नर्सेस इत्यादींचे 80 टक्के नोकऱया धोक्यात येऊ शकतात.

हिंदुस्थानातील नोकऱयांना धोका कसा?

गेल्या अनेक दशकांपासून हिंदुस्थानची जगाचे आऊटसार्ंसग हब म्हणून ओळख बनली आहे. आयटी, बीपीओ, का@ल सेंटर्स, बॅक-ऑफिस क्षेत्रातील कामांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ दिले. ‘एआय ऑटोमेशन’मुळे या क्षेत्रांचे स्वरूप पूर्णपणे बदलणार आहे. म्हणूनच हिंदुस्थानने यासाठी सज्ज राहायला हवे, असे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे.

एआयमध्ये अनेक देशांची मोठी गुंतवणूक

सजवानी म्हणाले की, चीन, अमेरिका, यूएई, सौदी अरब यासारखे देश मोठय़ा प्रमाणात ‘एआय’मध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करून ‘एआय’ सक्षमता वाढवत आहेत, तर जे देश संकोच करत आहेत ते प्रचंड मागे पडतील.

वेगाने जग बदलणार

इंटरनेटमुळे जग बदलले, मात्र जगात त्यापेक्षा 10 किंवा 100 पट जास्त बदल ‘एआय’मुळे होणार आहे. जे काम मानव करत आहेत, ते काम ‘एआय ऑटोमेशन’ यंत्रणा अधिक वेगाने पूर्ण करणार आहे. त्यामुळे जे देश बाहेरच्या देशांच्या मनुष्यबळावर अवलंबून आहेत त्यांना मोठा फटका बसू शकतो, असे भाकीतही सजवानी यांनी वर्तवले.