
रिअल इस्टेट आणि पायाभूत क्षेत्रातील कंपनी कॉन्फिडन्ट समूहाचे मालक सी. जे. रॉय यांनी त्यांच्या कार्यालयातच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आयकर खात्याने तीन दिवसांपासून त्यांच्या ठिकाणांवर शोधमोहीम सुरू केली होती. त्याचदरम्यान रॉय यांनी आत्महत्या केल्याने उद्योग जगतात खळबळ उडाली आहे.
आयकर खात्याच्या अधिकाऱयांनी रॉय यांच्या समूहाची चौकशी सुरू केली होती. त्यासाठी त्यांनी सर्च मोहीम सुरू केली. या तपासामुळे रॉय हे प्रचंड मानसिक तणावात होते. आयकर खात्याच्या अधिकाऱयांनी आजही त्यांची चौकशी केली. आयकर विभागाच्या दबावामुळेच आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या भावाने केला आहे.
























































