गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी मनीषा म्हैसकर, चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

बातमी शेर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारने चार सनदी अधिकाऱयांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी मनीषा  पाटणकर-म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी मिलिंद म्हैसकर यांची नेमणूक झाली आहे.

ज्येष्ठ सनदी अधिकारी आय. एस. चहल हे उद्या, रविवारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीने रिक्त होत असलेल्या गृह विभागाची जबाबदारी मनीषा पाटणकर-म्हैसकर यांच्याकडे सोपवली आहे. गृह विभागात नियुक्ती होण्यापूर्वी पाटणकर-म्हैसकर  या सार्वजनिक बांधकाम विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या जागी वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांची बदली झाली आहे.

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक बुवेनेसवरी एस. यांची माहिती-तंत्रज्ञान विभागाच्या संचालकपदी बदली झाली आहे. तर एच. एस. वसेकर यांची नेमणूक संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण, पुणे या पदावर झाली आहे.