
माणगाव : रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये उमेदवारांचा हायटेक प्रचार एका क्लिकवर सुरू झाला आहे. निवडणूक आता केवळ चौकसभा, मेळावे किंवा पोस्टर-बॅनरपुरतीच मर्यादित राहिली नसून निवडणूक प्रचाराने डिजिटल उंची गाठली आहे.
प्रत्येकाच्या हातात आज अँड्रॉइड मोबाईल आहे. याच माध्यमातून उमेदवार थेट मतदारांच्या घराघरात पोहोचत आहेत. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, युट्यूब प्लॅटफॉर्मवरून विकासकामांची माहिती, शुभेच्छा, व्हिडीओ, रिल्स, प्रचारगीते वेगाने प्रसारित होत आहेत.
























































