
दररोज एक नवीन व्यक्ती ग्लॅमरच्या जगात पाऊल ठेवते. नशीब आणि कठोर परिश्रमाने ते सर्वत्र प्रसिद्ध होतात. मात्र, काही काळानंतर त्यांच्या आयुष्यात एक वळण त्यांना ग्लॅमरपासून दूर घेऊन जाते तर, अनेकांना इंडस्ट्री सोडण्यास भाग पाडले जाते. तसेच आता मिस इंडिया कॅनडा विजेती, हिंदुस्थानची पहिली व्हिडिओ जॉकी आणि सामान्य लोकांपासून ते अमिताभ बच्चनपर्यंत सर्वांच्या मुलाखती घेणारी लोकप्रिय अँकर रूबी भाटियाची गोष्ट देखील अशीच काहीशी आहे. एक काळ असा होता रुबी भटीया सर्वत्र प्रसिद्ध होती. मात्र ती आता ती कुठेही दिसत नाही आहे.
गेल्या काही वर्षांपासून रूबीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रत्यक्षात, रूबी गायब झालेली नाही. तिने अध्यात्म निवडले, स्टारडम सोडला आणि वयाच्या 30 व्या वर्षी प्रसिद्धीचा त्याग केला. प्रसिद्धी मागे सोडून तिने स्वतःच्या अटींवर तिचे जीवन नव्याने सुरू केले. आज ती एक लाइफ कोच आहे. लोकांना संतुलन, आरोग्य आणि आनंद शोधण्यास मदत करते.
एका पॉडकास्टमध्ये बोलताना रूबीने स्पष्ट केले, “मी सध्या वजन कमी करणे, व्यक्तिमत्व विकास आणि वैयक्तिक समस्या असलेल्या लोकांना मदत करते.” तसेच रुबी म्हणाली की तिने मनोरंजन क्षेत्रात प्रवेश करण्याचा विचार कधीच केला नव्हता. हे सर्व अचानक घडले. ती म्हणाली, मी तत्वज्ञानाची विद्यार्थिनी होते आणि देव आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये तिला खूप रस होता. मला व्हीजे म्हणजे काय हे देखील माहित नव्हते. मी एमटीव्हीसाठी ऑडिशन दिली आणि माझी निवड झाली. आणि एमटीव्हीने स्टार टीव्हीसह चॅनल व्ही लाँच केले आणि पहिल्या सहा महिन्यांसाठी एकमेव व्हीजे बनली.
रुबीने प्रत्येक शो होस्ट केला, अधिकृतपणे हिंदुस्थानची पहिली व्हीजे बनली. व्हीजेनंतर तिने अभिनय करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये दिसली. रुबी चॅनल व्हीच्या काळात पहिला पती, गायक नितीन बालीशी भेटली. परंतु त्यांचे लग्न फक्त दोन वर्षे टिकले. वयाच्या ३० व्या वर्षी रूबीचे आयुष्य भावनिकदृष्ट्या एका विदारक टप्प्यावर पोहोचले. व्हीजे रूबीला दोन ओळखींमध्ये अडकल्यासारखे वाटू लागले. त्यामुळे तिने आध्यात्मिक साधना करण्याचा मार्ग निवडला. आज रूबी तिच्या दोन्ही मुलांसह आणि दुसरा पती अजितसोबत मुंबईत आनंदी जीवन जगते. ती ऑनलाइन प्रेरक सामग्री तयार करते आणि एक स्थिर जीवन जगत आहे.





























































