
पावसाळ्यात गावात वाढणारी झाडीझुडपे.गवत हे स्वखर्चाने तोडून गावात गेली 15 वर्ष सातत्याने साफसफाई करण्याचे सामाजिक व्रत घेतलेले हरिश्चंद्र धावडे हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून रत्नागिरी पंचायत समितीच्या कोतवडे गणातून निवडणूक लढवत आहेत.अतिशय साधी रहाणीमान आणि उच्च विचारसरणी असलेले उमेदवार हरिश्चंद्र धावडे यांना प्रचारादरम्यान प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
हरिश्चंद्र धावडे हे कोतवडे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत.ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून कोतवडे पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत आहेत.हरिश्चंद्र धावडे हे घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत.गणातील सर्व गावांच्या विकासासाठी आणि भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे हरिश्चंद्र धावडे यांनी सांगितले.
हरिश्चंद्र धावडे यांचे सामाजिक कार्य अचंबित करणारे आहे.ते कोतवडे गावातील स्वच्छतादूतच आहेत.पावसाळ्यात गावात झाडेझुडपे वाढतात.हि झाडेझुडपे हरिश्चंद्र धावडे स्वताच्या खर्चातून तोडून टाकतात आणि हे सामाजिक काम ते गेली 15 वर्ष करत आहेत.अनेक गोरगरीब लोकांना आरोग्य सेवा आणि शिक्षणासाठी ते मदत करतात.त्यामुळे ते जनतेत लोकप्रिय आहेत. हरिश्चंद्र धावडे कोतवडे पंचायत समिती गणात घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत.त्यांच्या सोबत उपविभाग प्रमुख नंदू कदम,अजय मयेकर,महेश कांबळे,मधुकर मांडवकर,यशवंत सनगरे,गजानन साळवी,रमेश मांडवकर,संजय पाष्टे,दत्ताराम पाष्टे राजू वाघधरे,सुभाष शितप ,दयानंद पवार आणि विश्वास बारगुडे उपस्थित होते.





























































