IND vs NZ 5th T20 – वर्ल्ड कपपूर्वी इशान किशनची बॅट तळपली, गोलंदाजांचा समाचार घेत ठोकलं कारकिर्दीतल पहिलं शतक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पाचवा टी-20 सामना आज (31 जानेवारी 2026) खेळला जात आहे. नाणेफेकीचा कौल जिंकतफ फलंदाजीसाठी उतररेल्या टीम इंडियाने दमदार फलंदाजी केली. संजू सॅमसनच्या (6) रुपात टीम इंडियाला पहिला हादरा लवकर बसला. मात्र, त्यानंतर आलेल्या इशान किशनने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली. त्याने 43 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 10 खणखणीत षटकारांच्या मदतीने आपल्या आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीतलं पहिलं शतक झळकावलं. त्याने 103 धावांची झुंजार खेळी केली.

सलामीला आलेला अभिषेक शर्माने 30 धावांची सलामी दिली. 48 धावांवर दोन विकेट अशी संघाची अवस्था होती. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या सोबतीने इशान किशनने आपल्या फलंदाजीची जादू दाखवली. सूर्यकुमारने 30 चेंडूंचा सामना केला आणि 6 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 63 धावांची खेळी केली. इशान किशन आणि सूर्यकुमारच्या मजबूत भागीदारीमुळे आणि हार्दिक पंड्याच्या महत्त्वपूर्ण 42 धावांमुळे टीम इंडियाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 271 धावा चोपून काढल्या आणि 272 धावांचं आव्हान न्यूझीलंडला दिले आहे.