प्रा. संजीव सोनावणे यांच्याकडे आरोग्य विद्यापीठाचा कार्यभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रा. संजीव सोनावणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती आचार्य देवव्रत यांनी याआधी ही जबाबदारी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. चंदनवाले यांच्याकडे सोपविण्यात आली होती. परंतु डॉ. चंदनवाले 31 जानेवारी रोजी निवृत्त झाले असल्याने पुढील आदेश होईपर्यंत प्रा. संजीव सोनावणे यांच्याकडे आरोग्य विज्ञान विद्यापीठाची जबाबदारी देण्यात आली आहे.