
सोन्या-चांदीच्या दरात शुक्रवारी मोठी घसरण झाली होती. मात्र, हा क्रॅश नसून नफावसुलीमुळे झालेली घसरण आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. मात्र, सोने-चांदीच्या दरात रविवारीही घसरण सुरुच राहीली. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी वायदे बाजार सुरू होताच सोने-चांदीच्या दरात घसरणीमुळे भूकंप झाला आहे. या घसरणीमुळे अनेक गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. वायदे बाजार सुरू होताच सोने 13000 तर चांदी 27000 रुपयांनी घसरली आहे.
सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये रविवारी अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी मोठी घसरण झाली आहे. अर्थसंकल्पानंतर रविवारी व्यवहार सुरू होताच सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत. चांदीच्या किमती २७,००० रुपयांपेक्षा जास्त घसरल्या आहेत. गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली, दोन्ही मौल्यवान धातू एकाच वेळी मोठ्या प्रमाणात घसरले. एकाच दिवसात चांदी ३०% पेक्षा जास्त घसरली, तर सोनेही जवळजवळ १७% ने घसरले. रविवारी, अर्थसंकल्पाच्या दिवशी, शेअर बाजार तसेच कमोडिटी मार्केट, एमसीएक्समध्ये सोने आणि चांदीचे व्यवहार सुरू होते. बाजार सुरू होताच सोने आणि चांदीत पुन्हा मोठी घसरण झाली आहे.
गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी सोने आणि चांदीचे भाव खूपच घसरले. गुरुवारी, चांदीने पहिल्यांदाच ४ लाख रुपयांचा टप्पा ओलांडून इतिहास रचला होता आणि ५ मार्चची एक्सपायरी डेट असलेल्या चांदीच्या किमतीने ४,२०,०४८ रुपयांचा नवीन उच्चांक गाठला होता. तथापि, दुसऱ्याच दिवशी, ती १.२८ लाख रुपयांनी घसरून २,९१,९२२ रुपये प्रति किलो झाली. रविवारी, अर्थसंकल्पाच्या दिवशी, तो ९% ने किंवा ₹२७,५०० पेक्षा जास्त घसरून ₹२,६५,६५२ प्रति किलोवर आला आहे.
सोन्यातही अशीच घसरण दिसून आली आहे. गुरुवारी १,९३,०९६ या ऐतिहासिक उच्चांकावर पोहचल्यावर २ एप्रिल रोजी एक्सपायरी डेट असलेल्या MCX १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली, ती ४२,२४७ ने घसरून १,५०,८४९ प्रति १० ग्रॅम झाली. रविवारी MCX वर व्यवहार सुरू होताच, तो ६% पेक्षा जास्त घसरला. सोन्यात प्रति १० ग्रॅम १३,००० रुपयांची घसरण झाली आणि ते १,४३,२०५ रुपयांवर पोहोचले.






















































