
हिंदुस्थानविरुद्ध सामना न खेळण्याची पाकिस्तानची घोषणा झाली असली, तरी हिंदुस्थानी संघ आपला नियोजित कार्यक्रम आणि आयसीसीच्या नियमांनुसार सर्व आवश्यक औपचारिकता पूर्ण करत श्रीलंकेत दाखल होणार आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या या भूमिकेचा हिंदुस्थानी संघाच्या कार्यक्रमावर कोणताही परिणाम होणार नाही. संघ नियोजित तारखेला श्रीलंकेत पोहोचेल, नियमित सराव सत्रे पार पाडेल, सामन्यापूर्वीची अनिवार्य पत्रकार परिषद घेईल आणि सामन्याच्या दिवशी ठरलेल्या वेळेत मैदानावर हजर राहील. जर पाकिस्तानचा संघ मैदानात उतरला नाही, तर आयसीसीच्या नियमांनुसार सामनाधिकारी परिस्थितीचा आढावा घेतील आणि त्यानंतर अधिकृत निर्णय जाहीर केला जाईल.


























































