Gold Silver Rate – आधी किमती गगनाला भिडल्या, आता भूईसपाट झाल्या, सोन्या-चांदीतील घसरण सुरुच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोने-चांदीच्या किमतीत होत असलेली घसरण थांबण्याचे नाव घेत नाही. अर्थसंकल्पाने शेअर बाजाराची निराशा केल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण दिसून आली होती. तसेच शुक्रवारी संध्याकाळपासून सोन्या- चांदीतील घसरणीचे सत्र अजूनही सुरुच आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशीही सोन्या-चांदीत मोठी घसरण दिसून आली होती. त्यानंतर आता आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी पुन्हा सोने-चांदीची पुन्हा मोठी घसरण झाली आहे. सोमवारी बाजाराची सुरुवात होताच चांदी ३२,००० ने घसरली आहे.तर चांदी ८००० रुपयांनी घसरली.

वायदे बाजारात म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोमवारी व्यवहार सुरू होताच सोने आणि चांदीत मोठी घसरण झाली. १ किलो चांदीची किंमत सुरुवातीच्या वेळी सुमारे १६,००० रुपयांनी घसरली, परंतु काही काळाच्या व्यवहारानंतर ती जवळजवळ ३२,००० रुपयांनी घसरली. तर सोन्याच्या किमतीत ८,००० रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली. गेल्या आठवड्यात गुरुवारी ऐतिहासिक ४ लाख रुपयांचा टप्पा ओलांडल्यापासून चांदीच्या किमती सतत घसरत आहेत. २०२६ च्या अर्थसंकल्पाच्या दिवशी, रविवारी ९% पेक्षा जास्त घसरण झाल्यानंतर, आठवड्याच्या पहिल्या व्यवहार दिवशी, सोमवारी एमसीएक्सवर कमोडिटी ट्रेडिंग सुरू झाले, तेव्हा चांदी उघडताच आणखी घसरली.

चांदीच्या किमती गेल्या व्यवहार दिवशी झपाट्याने घसरल्या आणि नंतर पुन्हा वाढल्या आणि अखेर २६५,६५२ रुपयांवर बंद झाल्या. सोमवारी व्यवहार सुरू होताच, त्या २५५,६५२ प्रति किलोपर्यंत घसरले, नंतर काही मिनिटांनी ते २४९,७१३ प्रति किलोपर्यंत पोहोचले आणि त्यानंतर लगेचच २३३,७७४ पर्यंत घसरले. याचा अर्थ चांदीच्या वायदा भावात ३१,८६३ ने घसरण झाली. चांदी गेल्या काही दिवसांत ज्या वेगाने वाढली आहे त्यापेक्षा वेगाने घसरत आहे. गुरुवारी, MCX वर चांदीच्या वायदा किमतीने सर्व विक्रम मोडले आणि ४,२०,०४८ या नवीन उच्चांकी पातळीवर पोहोचल्या. त्यानंतर किंमत या पातळीपासून १,८६,२७४ ने घसरली आहे.

चांदीच्या किमतीतील घसरणीमुळे, सोन्यातही घसरण होत आहे. बजेटच्या दिवशी सोने १३,००० ने घसरले, त्यानंतर त्यात थोडी रिकव्हरी झाली. रविवारी ते १,४७,७५३ वर बंद झाले. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर व्यवहार सुरू होताच ते १,४३,३२१ प्रति १० ग्रॅम पर्यंत घसरले आणि नंतर १,३८,८८८ पर्यंत घसरले. याचा अर्थ २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमच्या किमती ८,८६५ ने घसरल्या आहेत. गुरुवारी चांदीच्या किमतींसोबतच सोन्याच्या किमतींनीही एक नवीन उच्चांक गाठला त्यामध्ये प्रति १० ग्रॅम १,९३,०९६ रुपयांची वाढ झाली. ही पातळी गाठल्यानंतर, सोन्याच्या किमती कमी होऊ लागल्या आणि सध्या ते ५४,२०८ रुपयांनी कमी झाल्या आहेत.एमसीएक्सवर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सोन्याच्या किमतीत 7,500 रुपयांची घसरण होत ते 1,40,450 वर व्यवहार करत होते. तर चांदीच्या किमती 39,847 रुपयांनी घसरून 2,25,800 रुपयांवर व्यवहार करत होत्या.