
इराण आणि अमेरिकेदरम्यानच्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणमधील वॉर रूम पूर्णपणे ऑक्टिव्ह मोडवर आहे. कोणत्याही हल्ल्ल्याला त्वरित प्रत्युत्तर द्यायला सज्ज असल्याचे इराणच्या संसदेने सांगितले. याचदरम्यान परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी सौदी, मिस्र आणि तुर्कीशी संपर्क साधून परिस्थितीवर चर्चा केली. संसद समिती प्रवत्ते इब्राहिम रेजाई यांनी रविवारच्या बैठकीत सद्य परिस्थिती, सैन्याची तैनाती आणि सुरक्षा व्यवस्थेची माहिती घेतली. संभाव्य संघर्षाचा सामना करण्यासाठी सर्व प्रकारचे ऑपरेशन प्लॅन्स तयार आहेत. कोणत्याही हल्ल्याचा जवाब थेट युद्धभूमीत दिला जाईल, असा इशारा इब्राहिम रेजाई यांनी दिला. शत्रू गटाच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून असल्याची माहिती कमांडरनी बैठकीत दिली. अमेरिकेने मूर्खपणाचे पाऊल उचलले आणि इराणवर हल्ला केला तर ती स्वतः एका मोठय़ा क्षेत्रीय युद्धात अडकून बसेल, असा इशारा रेजाई यांनी दिला.
- कमांडर्सच्या बैठकीत इराणने आपली मिसाईल क्षमता आणि आक्रमक सैन्य ताकदीचा अहवाल सादर करण्यात आला. जून 2025 मध्ये झालेल्या 12 दिवसांच्या युद्धानंतर इराणची ताकद आणखी मजबूत झाल्याचा दावा करण्यात आला.
- इराणचे परराष्ट्रमंत्री इब्राहिम रेजाईने सौदी, मिस्र आणि तुर्की येथील संबंधित अधिकाऱयांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. अमेरिकेच्या कारवाया आणि संभावित धोका या अनुषंगाने चर्चा झाली.































































