
10 दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला सनी देओलची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट ‘बॉर्डर-2’ने शाहरुख खानच्या ‘पठाण’चा रेकॉर्ड मोडला आहे. ‘बॉर्डर-2’ने रविवारी 10 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 22.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘बॉर्डर-2’ने आतापर्यंत एकूण कमाई 275.25 कोटी रुपये केली आहे. पहिल्या दिवशी 30 कोटी, दुसऱ्या दिवशी 36.5 कोटी, तिसऱया दिवशी 54.5 कोटी, चौथ्या दिवशी 59 कोटी, पाचव्या दिवशी 20 कोटी, सहाव्या दिवशी 13 कोटी, सातव्या दिवशी 11.25 कोटी, आठव्या दिवशी 10.75 कोटी, नवव्या दिवशी 17.75 कोटी आणि दहाव्या दिवशी 22.50 कोटींची कमाई केली आहे.

























































