Pankaja Munde News – पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. उड्डाणापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगरवरून लातूरकडे हेलिकॉप्टरने निघाल्या होत्या. यादरम्यान ही घटना घडली.

निवडणूक प्रचारासाठी पंकजा मुंडे आज लातूर दौऱ्यावर आहेत. यासाठी त्या संभाजीनगरवरून हेलिकॉप्टरने प्रवास करणार होत्या. पण अचानक त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. मात्र वेळीच हा बिघाड लक्षात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. आहे. या हेलिकॉप्टरमध्ये नेमका काय बिघाड झाला आहे याबाबात अद्यापही माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, अचानक झालेल्या या बिघाडामुळे पंकजा मुंडे यांच्या लातूरमधील सभांच्या वेळांमध्येही बदल करण्यात आला आहे. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना लातून वेळेत पोहोचणे कठीण आहे.