मुंबई विमानतळावर विमानांची धडक, सुदैवाने मोठा अपघात टळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील सर्वात व्यस्त असलेल्या मुंबई विमानतळावर आज सायंकाळी एक मोठा अपघात टळला. एअर इंडिया आणि इंडिगो या विमान पंपन्याच्या दोन विमानांचे पंख एकमेकांना जोरात धडकले. घटना घडली त्यावेळी दोन्ही विमानांमध्ये प्रवासी होते. मात्र, कोणीही जखमी झालेले नाहीत.

प्राप्त माहितीनुसार, सायंकाळी 7.30 वाजता एअर इंडियाचे मुंबईहून कोइम्बतूर येथे जाणारे विमान टेकऑफच्या आधी टॅक्सी-वे वर उभे होते. त्याचवेळी इंडिगोचे हैदराबाद येथून मुंबईला येणारे विमान लँडिंगनंतर पार्ंकगकडे हळूहळू सरकत होते. त्याचवेळी दोन्ही विमानांचे पंख एकमेकांना धडकले. या घटनेची डीजीसीएने चौकशी सुरू केली आहे.