
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात चंद्रपुरात सुरू असलेला वाद अखेर दिल्लीत पोहचला आहे. वडेट्टीवार 18 नगरसेवकांना घेऊन दिल्लीत दाखल झाले असून ते नगरसेवकांसह काँग्रेस सचिव के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेणार आहेत.
चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यातील 18 नगरसेवक वडेट्टीवार समर्थक आहेत तर 9 नगरसेवक धानोरकर समर्थक आहेत. दोन्ही गटांकडून स्वतंत्र गटनोंदणी करण्यात आली आहे. वडेट्टीवार-धानोरकर वादात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यामुळेच वडेट्टीवार यांनी दिल्ली गाठली आहे.


























































