ऑनलाईन गेमचे व्यसन; ३ सख्ख्या बहिणींनी ९ व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ghaziabad sisters suicide 3 minors jump off 9th floor over gaming addiction

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. ऑनलाईन गेमच्या व्यसनावरून पालकांनी रागावल्यामुळे तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींनी इमारतीच्या ९ व्या मजल्यावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. ‘भारत सिटी’ या निवासी टाऊनशिपमध्ये बुधवारी पहाटे २ च्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पाखी (१२), प्राची (१४) आणि विंशिका (१६) अशी मृत मुलींची नावे आहेत. या तिन्ही बहिणींचे एकमेकींवर खूप प्रेम होते आणि त्या जेवण्यापासून ते शाळेत जाण्यापर्यंत एकत्रच करायच्या. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांना ऑनलाईन गेमिंगचे भीषण व्यसन जडले होते.

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कोविड काळात त्यांना ऑनलाईन गेमचे व्यसन जडले. लॉकडाऊन दरम्यान या मुलींना ऑनलाईन गेम्सची सवय लागली. त्या तिघी टास्कवर आधारित एका कोरियन ऑनलाईन गेमच्या आहारी गेल्या होत्या.

या गेमिंगमुळे मुलींचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते आणि त्या नियमित शाळेतही जात नव्हत्या. पालकांनी या गोष्टीला विरोध करत त्यांना गेम खेळण्यापासून रोखले, ज्याचा राग मनात धरून मुलींनी हे टोकाचे पाऊल उचलले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. एकाच वेळी तीन मुली गमावल्यामुळे परिसरात आणि त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

ghaziabad sisters suicide: 3 minors jump off 9th floor over gaming addiction

three minor sisters in ghaziabad’s bharat city committed suicide by jumping from the 9th floor after parents objected to their online gaming addiction. read more.