
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत ऊर्फ थलैवा आपल्या उदार स्वभावासाठी आणि साधेपणासाठी ओळखले जातात. चांगले कृत्य करणाऱयांची पाठ थोपटायलाही ते मागेपुढे पाहत नाहीत. रजनीकांत यांनी एका महिला स्वच्छता कर्मचाऱयांचा घरी बोलावून सत्कार केला आहे. यासंबंधीचे फोटो रजनीकांत यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पद्मा नावाची ही महिला असून ती स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करते. पद्मा चेन्नईच्या टी नगर परिसरात काम करत असताना तिला एक बेवारस पाऊच सापडला. या पाऊचमध्ये 360 ग्रॅम सोन्याचे दागिने होते. पद्माने हे दागिने स्वतःकडे न ठेवता तत्काळ ही माहिती वरिष्ठांना दिली आणि तो पाऊच पोलीस ठाण्यात जमा केला. लाखो रुपयांचे दागिने असूनही पद्माने मनात कोणतीही लालसा न ठेवता प्रामाणिकपणा दाखवला. ही गोष्ट रजनीकांत यांना समजताच त्यांनी पद्माला घरी बोलावले. तिच्या गळ्यात सोन्याची साखळी घालून तिचे कौतुक करत सत्कार केला. याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. रजनीकांत यांच्या सत्कारानंतर तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनीही त्यांना स्वतः बोलावून सन्मानित केले आणि बक्षीस म्हणून एक लाख रुपयांचा चेक दिला आहे. पद्माच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र काैतुक केले जात आहेत. रजनीकांत यांनी एखाद्याचे काwतुक करून त्याला सन्मानित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, त्यांनी अभिनेता ऋषभ शेट्टीला घरी बोलावून सोन्याची साखळी भेट दिली होती.






























































