मुंबई मेट्रोला शिवाजी महाराज, नाना शंकरशेट यांच्या नावाचे वावडे! नाना शंकरशेट प्रतिष्ठानचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai metro under fire for shortening names of chhatrapati shivaji maharaj and nana shankarshet

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि मुंबईचे आद्य शिल्पकार, हिंदुस्थानी रेल्वेचे जनक नाना जगन्नाथ शंकरशेट या महापुरुषांच्या नावांत मुंबई मेट्रोने शॉर्टकट मारला आहे. मेट्रोच्या तिकिटांवर ही दोन्ही नावे ‘सीएसएमटी’ व ‘जेएसएस’ अशी लिहिण्यात आली आहेत. नाना शंकरशेट प्रतिष्ठानने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई मेट्रोला महापुरुषांच्या नावाचे वावडे का, असा सवाल प्रतिष्ठानने केला आहे.

मेट्रोच्या कुलाबा ते सीप्झ मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नाना जगन्नाथ शंकरशेट ही स्थानके आहेत. मात्र मेट्रोच्या तिकिटांवर या स्थानकांच्या नावाचा पूर्ण उल्लेख नाही. त्याऐवजी संक्षिप्त रुपे आहेत. नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे सरचिटणीस ऍड. मनमोहन चोणकर यांनी यास तीव्र आक्षेप घेतला आहे.

एक महिन्याचा अल्टिमेटम

‘‘महापुरुषांची थोरवी सर्वांना कळावी यासाठी वास्तूंना आणि स्थानकांना त्यांची नावे दिली जातात. मात्र ही नावे संक्षिप्त करून मुंबई मेट्रो त्यांना अपमानित करीत आहे. हे सहन केले जाणार नाही. या दोन्ही नावांत बदल करून सुधारित तिकिटे प्रसिद्ध करण्यासाठी एक महिन्याची वेळ देत आहोत. योग्य बदल न झाल्यास मेट्रो प्रशासनाविरोधात हजारो शिवभक्त आणि नानाप्रेमी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील,’’ असा इशारा चोणकर यांनी दिला आहे.

mumbai metro under fire for shortening names of chhatrapati shivaji maharaj and nana shankarshet

nana shankarshet pratishthan slams mumbai metro for using ‘csmt’ and ‘jss’ abbreviations on tickets. protesters issue a one-month ultimatum to restore full names of the great icons.