आयुष्यभराच्या कष्टाचे फळ मिळालं…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
emotional viral video cycle mechanic father breaks down as son hands over cisf joining letter

सोशल मीडियावर बापलेकाचा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये मुलगा आपल्या वडिलांना आयुष्यातील सर्वात मोठं सरप्राईज देताना दिसतो. वडील सायकल दुरुस्तीच्या दुकानात नेहमीप्रमाणे काम करत असतात. त्यांचे हात ग्रीसने भरलेले आहे, तेवढय़ात त्यांचा मुलगा दुकानात येतो आणि शांतपणे त्यांच्या हातात एक लिफाफा देतो. वडील लिफाफा उघडतात. लिफाफ्यात मुलाचं सीआयएसएफमधील नोकरीचं जॉइनिंग लेटर असते. ते वाचताच वडिलांच्या डोळ्यांत पाणी येतं. शब्द फुटत नाहीत, हात थरथर कापू लागतात आणि क्षणातच त्यांच्या चेहऱयावर आनंद दिसतो. हा व्हिडिओ @sonuydv87 या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

emotional viral video: cycle mechanic father breaks down as son hands over cisf joining letter

watch the heart-touching moment a cycle mechanic father receives his son’s cisf joining letter. a viral video capturing the reward of a lifetime of hard work and struggle.