
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे विभागाने बार्ंडग नियमामध्ये मोठा बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. नव्या नियमानुसार, जर तिकीट कन्फर्म असलेल्या प्रवाशाने बाेर्डींग स्टेशनवरून गाडी पकडली नाही तर त्याचे कन्फर्म तिकीट दुसऱयाला जाण्याचा धोका निर्माण होणार आहे. जर समजा एखाद्या प्रवाशाने तिकीट काढताना बाेर्डींग स्टेशन दादर मार्प केले असेल आणि त्याने दादर स्टेशनऐवजी ठाणे किंवा कल्याण स्टेशनवरून प्रवास करण्याचे ऐनवेळी ठरवले असेल तर त्या प्रवाशाची सीट दुसऱ्या प्रवाशाला दिली जाऊ शकते. कारण टीटीईला जर दादर स्टेशनमध्ये संबंधित सीटवर कोणताही प्रवासी बसल्याचे आढळले नाही तर ते सीट वेटिंगवरील प्रवाशाला दिले जाईल, असे या नव्या नियमात आहे.
प्रवाशाने तिकीट काढताना जे बाेर्डींग दिले आहे तेथून बसणे बंधनकारक असणार आहे, अन्यथा रिकामे सीट दिसताच रेल्वेतील टीटीई हे सीट रिकामे आहे, असे आपल्या डिजिटल डिव्हाइस (ईएफटी) मध्ये त्याला नॉट टर्न अप म्हणजेच संबंधित प्रवासी पोहोचला नाही, असे मार्प करेल. टीटीईच्या या मार्पनंतर ही सीट ऑटोमेटिकली रिकामी दिसेल. ज्या प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळाले नाही, त्याच ट्रेनने प्रवास करणाऱ्या वेटिंग किंवा आरएसी असलेल्या प्रवाशांच्या मोबाईलवर तत्काळ एक मेसेज येईल. संबंधित डब्यातील सीट रिकामी आहे, असे त्या प्रवाशाला मोबाईलवर दिसेल. ती रिकामी सीट त्या वेटिंगवर असलेल्या प्रवाशाला दिली जाईल. हा सर्व प्रकार सॉफ्टवेयरद्वारे होणार आहे. जर प्रवाशाला तिकिट काढल्यानंतर बोर्डिंग बदलायचे असेल तर त्याने रेल्वेच्या नियमानुसार बोर्डिंग बदलणे गरजेचे आहे. अन्यथा त्याला फटका बसू शकतो. दरम्यान, रेल्वेच्या आकडेवारीनुसार, प्रत्येक ट्रेनमध्ये सरासरी 3 ते 5 टक्के प्रवासी असे असतात. ज्यांचे कन्फर्म तिकीट असूनही ते अखेरच्या क्षणी प्रवास करण्याचे टाळतात.


























































