
बिहारमध्ये भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. दररोज सरासरी 776 लोकांना या पुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती बिहारच्या आर्थिक सर्वेक्षणातून समोर आली आहे.
विधानमंडळाच्या बजेटआधी आर्थिक सर्वेक्षण रिपोर्ट सादर केली. या रिपोर्टनुसार, वर्षभरात दोन लाख 83 हजार 274 गुन्हे दाखल झाले आहेत. जे मागील आर्थिक वर्षात 2 लाख 44 हजार 367 प्रकरणाच्या तुलनेत 38 हजार 907 अधिक आहेत. भटक्या कुत्र्यांनी लोकांना चावा घेतलेल्या सर्वाधिक घटना या बिहारची राजधानी पटनामध्ये घडल्या आहेत. 2024-25 मध्ये 29 हजार 280 घटना घडल्या आहेत.


























































