
इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करण्यावर सध्या चर्चा सुरू आहे. शुक्रवारी, 6 फेब्रुवारीला तुकाaच्या अंकारामध्ये अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे विदेश मंत्री अब्बास अराघची यांची भेट होणार आहे. इराणमधून युरेनियम हटवण्यासाठी अमेरिका प्रयत्न करणार आहे. इराणकडे 60 टक्क्यांपर्यंत संवर्धित 440 किलो युरेनियम आहे. या डीलआधीच युरेनियमवर तुकाa आणि रशियाची नजर आहे.
रशियाच्या म्हणण्यानुसार, इराणसोबत चर्चा सुरू आहे. जर सर्वकाही ठीक राहिले तर सर्व युरेनियम रशियात शिफ्ट केले जाऊ शकते, तर तुकाaचीही नजर इराणच्या संवर्धित युरेनियमवर आहे. इराणच्या 440 किलो युरेनियमला नष्ट करण्यासाठी जून 2025 मध्ये अमेरिकेने 3 बी-2 बॉम्बरने बॉम्ब पाडले होते, परंतु तरीही हे नष्ट झाले नव्हते. तुकाaने यासंबंधी एक ऑफर देऊ केली आहे. इराणमधील संवर्धित युरेनियम तुकाaकडे ठेवायला हवे. तुकाaकडे कोणतेही अण्वस्त्र नाही. अमेरिका आणि रशियाच्या तुलनेत इराण तुकाaकडे हे युरेनियम ठेवण्याची शक्यता आहे.
अन्यथा तेहराणवर हल्ला
शुक्रवारी विटकॉफ इराणचे विदेशमंत्री यांची भेट घेणार आहे. अण्वस्त्र समझोतावर चर्चा करणे हा प्रमुख उद्देश आहे. भविष्यात इराणने कोणतेही अण्वस्त्र शस्त्र बनवू नये, यासाठी अमेरिका प्रयत्न करणार आहे. जर इराणसोबत चर्चा करूनही काही तोडगा निघाला नाही तर अमेरिका तेहराणवर हल्ला करेल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.




























































