
आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचे सहाय होत आहे. पाकिस्तानच्या अस्वस्थ बलुचिस्तान प्रांतातील ‘रेको दिक’ (Reko Diq) या सोन्या-तांब्याच्या खाण प्रकल्पासाठी अमेरिकेने सुमारे १.३ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची वचनबद्धता जाहीर केली आहे. जगातील सर्वात मोठ्या अविकसित खनिज साठ्यांपैकी एक असलेल्या या प्रकल्पातील ही विदेशी गुंतवणूक पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मात्र यानिमित्ताने अमेरिका पाकिस्तानच्या सोन्यावर डोळा ठेवून आहे.
बलुचिस्तानमधील इराण सीमेजवळील हा प्रकल्प एकूण ७ अब्ज डॉलर्सचा असून, २०२८ च्या अखेरीस येथून उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे. कॅनडाची प्रसिद्ध खाण कंपनी ‘बॅरिक मायनिंग कॉर्पोरेशन’ (Barrick Gold) कडे या प्रकल्पाची ५० टक्के मालकी आहे. उर्वरित २५ टक्के हिस्सा पाकिस्तानच्या तीन सरकारी उपक्रमांकडे, तर २५ टक्के हिस्सा बलुचिस्तान सरकारकडे आहे. अमेरिकेची ही गुंतवणूक ‘एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ युनायटेड स्टेट्स’ (EXIM) च्या माध्यमातून केली जाणार आहे.
सुरक्षेचे मोठे आव्हान
हा प्रकल्प बलुचिस्तानच्या दुर्गम आणि फुटीरतावादी हिंसाचाराने प्रभावित भागात आहे. या खाणीतून मिळणारे तांबे प्रक्रियेसाठी कराचीला नेण्यासाठी रेल्वे मार्ग सुधारणे आवश्यक आहे. मात्र, या भागात होणारे दहशतवादी हल्ले आणि सुरक्षा हा या प्रकल्पापुढील सर्वात मोठा अडथळा आहे. ‘बॅरिक गोल्ड’ने २०२४ मध्ये आपल्या साठ्यात १३ दशलक्ष औंस सोन्याची भर टाकली आहे, तर या प्रकल्पातून दरवर्षी २ लाख मेट्रिक टन तांबे उत्पादित करण्याचे उद्दिष्ट आहे.
भूराजकीय महत्त्व
अमेरिकेची ही गुंतवणूक केवळ आर्थिक नसून ती भूराजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाची आहे. सध्या जागतिक स्तरावर खनिजांच्या पुरवठ्यासाठी मोठी स्पर्धा सुरू आहे. चीनवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि स्वतःची सप्लाय चेन मजबूत करण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानातील या प्रकल्पात रस दाखवला आहे. शहबाज शरीफ सरकारने या गुंतवणुकीचे स्वागत केले असून, यामुळे देशाच्या खाण क्षेत्रात आणि आर्थिक सुधारणांमध्ये विश्वास वाढेल, अशी आशा व्यक्त केली आहे.
us to invest 1.3 billion dollars in pakistans reko diq gold mine in balochistan
the united states has committed 1.3 billion dollars for the reko diq gold and copper project in pakistan’s balochistan province. check the geopolitical significance of this investment.

























































