
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विदेश दौरा थांबायचे नाव घेत नाही. पंतप्रधान झाल्यापासून ते दर महिन्याला परदेश दौरा करत आहेत. पंतप्रधान मोदी हे उद्या, 7 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा दोन दिवसांच्या मलेशियाच्या दौऱयावर जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मोदींचा हा दौरा दोन दिवसांचा असून ते या दौऱ्यात मलेशियातील क्वालालंपूर येथे मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम आणि हिंदुस्थानी समुदायाच्या लोकांना भेटणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या मलेशिया दौऱयादरम्यान 10 वे भारत-मलेशिया सीईओ पह्रम आयोजित केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विदेश दौरे हे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यापेक्षा जास्त असल्याची माहिती आकडेवारीतून समोर आली आहे. विदेश दौऱ्यावर कोटयवधी रुपयांचा चुराडा होत असल्याचीही माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान मोदींचे विदेश दौरे
7 ते 8 फेब्रुवारी मलेशिया
15 ते 18 डिसेंबर जॉर्डन, इथिओपिया, ओमान
21 ते 23 नोव्हेंबर दक्षिण आफ्रिका
11 ते 12 नोव्हेंबर भूतान
29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर जपान, चीन
23 ते 26 जुलै यूके, मालदीव
2 ते 9 जुलै अर्जेंटिना, ब्राझील, नामिबिया
15 ते 19 जून सायप्रस, पॅनडा, क्रोएशिया
22 ते 23 एप्रिल सौदी अरब
3 ते 6 एप्रिल थायलंड, श्रीलंका
11 ते 12 मार्च मॉरिशस
परराष्ट्र मंत्र्यांचे विदेश दौरे
4 ते 9 जानेवारी फ्रान्स, लक्झमबर्ग
23 डिसेंबर श्रीलंका
15 डिसेंबर संयुक्त अरब अमिरात, इस्रायल
17 ते 19 नोव्हेंबर रशिया
11 ते 13 नोव्हेंबर पॅनडा
27 ऑक्टोबर मलेशिया
19 ते 21 ऑगस्ट रशिया
13 ते 15 जुलै सिंगापूर, चीन
30 जून ते 2 जुलै यूएसए
19 ते 24 मे नेदरलँड, डेन्मार्प, जर्मनी
4 ते 9 मार्च दक्षिण आफ्रिका



























































