
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर अबुझमाडच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत 3 नक्षलवादी ठार झाले तर, एक जवान शहीद झाला. एक जवान जखमी झाला असून त्याला एअरलिफ्ट करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, आज सकाळी अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांच्या पथकाद्वारे शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. त्यावेळी त्यांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली. या चकमकीत सी-60 पथकाचे कॉन्स्टेबल दीपक चिन्ना मदावी (38) गंभीर जखमी झाले. त्याला हेलिकॉप्टरने भामरागड उप-जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळावरून तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यात एका महिलेचाही समावेश आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात आहे. एका दिवसापूर्वीच नक्षल कमांडर उधम सिंहचा खात्मा
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी नक्षलवादी कमांडर उधम सिंहचा खात्मा केला होता. उधम सिंह हा 2021 मध्ये झालेल्या टेपुलगुडेम चकमकीत सामील होता. या हल्ल्यात 22 जवान शहीद झाले होते.




























































