शून्य मोठा की अठरा? हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करारावर अखिलेश यादव यांची केंद्र सरकारवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात नुकत्याच झालेल्या व्यापार कराराच्या (Trade Deal) मुद्द्यावरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या करारावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. हा करार पूर्णपणे एकतर्फी असून हिंदुस्थानने अमेरिकेसमोर आपल्या हितांची शरणागती पत्करल्याचा गंभीर आरोप यादव यांनी केला आहे. विशेषतः आयात-निर्यात शुल्कामध्ये (टॅरिफ) असलेल्या तफावतीवरून त्यांनी भाजप सरकारला धारेवर धरले आहे.

अखिलेश यादव यांनी X वर एक पोस्ट करत सरकारला प्रश्न विचारताना म्हटले की, “शून्य मोठे आहे की अठरा मोठे?” त्यांनी पुढे प्रश्न केला की भाजपच्या तडजोडीच्या अंकगणितात १८ = ० आहे का? त्यांनी विचारले की देशातील शेतकरी, दुकाने आणि उद्योगांना वाचवण्यासाठी भाजपकडे पोकळ शब्दांव्यतिरिक्त इतर कोणतीही सुरक्षा किंवा संरक्षण योजना आहे का?

दरम्यान, हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करार म्हणजे एक प्रकारे शरणागती असल्याचे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. अखिलेश यांनी विचारले की, “हिंदुस्थानचे हितसंबंध सोडून देण्याच्या सक्तीमागील खोल रहस्य काय आहे? हा व्यवहार म्हणजे तिथे बनवले, इथे पोहोचले, असे एकतर्फी प्रकरण आहे का?