सौदी अरबमध्ये आता उंटाला मिळणार पासपोर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सौदी अरब सरकारने सर्वांना आश्चर्यात टाकणारा निर्णय घेतला आहे. सौदीत आता उंटांना पासपोर्ट देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे उंटांची खरेदी-विक्री, ओळख आता आणखी सोपी होणार आहे. सौदीत उंटांचा वापर हा परिवहन, व्यापार आणि वाळवंटात सर्वात जास्त केला जातो. उंटाला पासपोर्ट दिल्याने सौदीत पर्यावरण, जल आणि कृषी मंत्रालय या सेक्टरचे महत्त्व वाढेल, असे सरकारला वाटते. 2024 मध्ये सौदीमध्ये जवळपास 22 लाख उंटांची संख्या होती. उंट पाळणे हे सौदीत कमाई करणारा उद्योग म्हणून ओळखला जातो. उंटांचा पासपोर्ट असलेला फोटोही मंत्रालयाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा पासपोर्ट हिरव्या रंगाचा आहे. यावर राष्ट्रीय प्रतीक आणि सोनेरी रंगाच्या उंटाचा फोटो आहे.