
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव पंचायत समिती गणातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सागर तांदळे १५२० मतांनी विजय झाले असून माझी सभापती जयसिंग माने यांचा त्यांनी दारुण पराभव केला. जयसिंग माने यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र साखरपा कोंडगाव येथील जनतेने शिवसेनाशी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रामाणिक राहून स्वार्थासाठी पक्ष बदललेल्या मंडळींना या निवडणुकीत धडा शिकवला आहे.
सागर तांदळे हा सामान्य कुटुंबातील तरुण असून माझी सभापती जयसिंग माने अशा मुरलेल्या मुरब्बी राजकारण्याला भुईसपाट करणे ही त्याच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला कठीण गोष्ट असतानाही जनतेचा कौल आणि कै. पिंट्या तांदळे आणि माजी मंत्री रवींद्र माने यांच्या आशीर्वादाने प्रचंड मतांनी निवडून आले. तालुक्यात नव्हे तर, जिल्ह्यात या निवडणुकीची चर्चा असून जनतेच्या मनात काय असू शकतं हे या विजयावरून समोर आले आहे. यावेळी माजी मंत्री रवींद्र माने यांनी म्हटले की सागर तांदळे चा विजय हा कै.पिंट्या तांदळे यांना श्रद्धांजली आहे.





























































