
बारामती येथे 28 जानेवारीला सकाळी पावणे नऊच्या सुमारास झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. या विमान अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेतेही या अपघाताची सखोल आणि पारदर्शक चौकशीची मागणी करत आहेत.
दुसरीकडे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्याही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी दुखवटा संपल्यानंतर पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मंगळवारी दुपारी 4 वाजता आपण पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली.
बारामतीतील विमान अपघातात झालेल्या अजितदादांच्या दुर्दैवी निधनाबाबत महाराष्ट्रासह माझ्याही मनात अनेक शंका आहेत. यासंदर्भात आज (मंगळवार, दि. 10 फेब्रुवारी) सायंकाळी 4 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे तपशीलवार मांडणार आहे, अशी माहिती रोहित पवार यांनी ‘एक्स’वर दिली. त्यामुळे ते काय गौप्यस्फोट करणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
बारामतीतील विमान अपघातात झालेल्या अजितदादांच्या दुर्दैवी निधनाबाबत महाराष्ट्रासह माझ्याही मनात अनेक शंका आहेत. यासंदर्भात आज (मंगळवार, दि. १० फेब्रुवारी) सायंकाळी ४ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे तपशीलवार मांडणार…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 10, 2026


























































