पुस्तक वादावर नरवणे यांनी सोडले मौन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

’फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या आत्मचरित्रपर पुस्तकावरून झालेल्या वादावर माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी आज प्रथमच मौन सोडले. प्रकाशक ’पेंग्विन रँडम हाऊस इंडिया’ने एक्सवर केलेली पोस्ट नरवणे यांनी शेअर केली असून ’पुस्तकाची सद्यस्थिती ही आहे’ अशी टिप्पणी केली आहे.

संरक्षण मंत्रालयाने प्रकाशनाला मंजुरी दिली नसतानाही नरवणे यांचे पुस्तक ऑनलाइन उपलब्ध असल्याचे समोर आले होते. त्यामुळे हे पुस्तक बाजारात कसे आले, याचा तपास दिल्ली पोलिसांनी सुरू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रकाशक पेंग्विन इंडियाने सोशल मीडियात खुलासा केला आहे. तीच आपली भूमिका असल्याचे नरवणे यांनी सुचवले आहे.

पेंग्विन इंडियाच्या पोस्टमध्ये काय?

’फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’च्या प्रकाशनाचे अधिकार केवळ आमच्याकडे आहेत. हे पुस्तक अद्याप छापील किंवा डिजिटल स्वरूपात प्रकाशित, वितरित किंवा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. ते कोणत्याही प्लॅटफॉर्मवर आढळल्यास थेट कॉपीराइटचे उल्लंघन ठरेल, असे पेंग्विनने म्हटले आहे.