
>> प्रभाकर पवार, [email protected]
प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू विलेपार्ले (पश्चिम) येथील शेट्टी टॉवरच्या दिशेने १ व २ जानेवारीच्या रात्री १ वाजता गोळीबार करण्यात आला. स्कूटरवरून आलेल्या शूटरने ५ गोळ्या झाडल्या. जुहू येथेच गाडी सोडून तो शूटर रिक्षाने पळून गेला. पुढे तो पब्लिक टान्सपोर्टने पुण्याला पोहोचला. गोळीबारासाठी जी स्कूटर वापरली त्याच्या मालकाचा शोध घेऊन मुंबई क्राईम ब्रँचच्या खंडणीविरोधी पथकाने पुण्यातील धायरी, कर्वेनगर आदी भागांतून ५ आरोपींना अटक केली. हा गोळीबार पुण्याचा लॉरेन्स बिष्णोई टोळीतील शुभम लोणकर याने मुंबईतील सिनेनिमति, कलावंत आदी व्हीआयपींमध्ये बिष्णोई टोळीची दहशत निर्माण व्हावी म्हणून घडवून आणला. आमच्याच टोळीतील सदस्यांनी रोहित शेट्टीच्या घराजवळ फिल्डिंग लावून गोळीबार केला असल्याची जबाबदारी शुभम लोणकर या पुण्यातील गुंडाने घेतली. १) स्वप्नील बंडू सकट (२३. बेकार, राहणार वडगाव, सिंहगड रोड, पुणे), २) समर्थ शिवशरण पोमाजी (१९. बेकार, गुलमोहर, धायरी, पुणे), ३) सिद्धार्थ दीपक येनपुरे (१९, डिलिव्हरी बॉय, आम्रपाली, धायरी फाटा), ४) आदित्य ज्ञानेश्वर गायकी (१९, व्यवसाय सेल्समन, कर्वेनगर, पुणे) व ५) आसाराम फासले (पुणे) अशा पाच जणांना मुंबई क्राईम ब्रँचने हल्ला झाल्यानंतर पुण्यातून अटक केली. प्रत्यक्ष गोळीबार करणारा शूटर अद्यापि पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
पंजाबच्या पोलिसाचा मुलगा लॉरेन्स बिष्णोई हा सध्या गुजरातच्या साबरमती कारागृहात आहे. यापूर्वी त्याने सिनेअभिनेता सलमान खान व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे बाबा सिद्दिकी या माजी गृह राज्यमंत्र्यावर गोळीबार केला होता. त्यात सलमान खान बचावला तर बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला. या दोन्ही हल्ल्यांत लॉरेन्स बिष्णोई याने उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब व महाराष्ट्रातील डोंबिवली, नवी मुंबई, पुणे, अकोला, अंबरनाथ आदी भागांतील दोन डझन पोरं वापरली होती. शूटर हे उत्तर प्रदेशातील होते. रोहित शेट्टी गोळीबारातही लॉरेन्स बिष्णोईचा पुण्याचा भाई शुभम लोणकरने महाराष्ट्रातील शूटरचा वापर केला असण्याची शक्यता आहे.
लॉरेन्स बिष्णोई हा शुभम लोणकरच्या मदतीने पुण्यातील बेकार तरुणांचा रेकी करण्यासाठी व फिल्डिंग लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर करतो. बेकार तरुणांचा logistic support घेतो. तीच पोरं पकडली जातात. रोहित शेट्टीवरील हल्ल्यासाठी शुभम लोणकरने मुंबईत रोहित शेट्टीच्या टॉवरजवळ फिल्डिंग लावण्यासाठी आलेल्या पोरांना फक्त ४० हजार रुपये दिले. प्रत्येकाच्या वाट्याला ५ हजारसुद्धा आले नाहीत. बडे गैंगस्टर कधीही रेकी करणाऱ्या, फिल्डिंग लावणाऱ्या पोरांना ५ हजारांपेक्षा अधिक पैसे देत नाहीत. स्वतः मात्र सिने कलावंतांकडून करोडो रुपये खंडणी हवालामार्फत वसूल करतात. थोडक्यात. बेकार मुलांचा गैंगस्टर गैरवापर करून घेतात.
लॉरेन्स बिष्णोईला मुंबईमध्ये, विशेषतः बॉलीवूडमध्ये आपले वर्चस्व निर्माण करायचे आहे. त्यासाठी तो कोणत्याही थराला जात आहे. सिनेसृष्टीतील बड्या निर्मात्यांना, कलावंतांना टार्गेट केले तर खंडणीचा रतीब सुरू होईल. अबू सालेम, छोटा शकील, अनिस इब्राहीम, रवी पुजारी या गँगस्टरनी खंडणीचा रतीब सुरू करण्यासाठी मुंबईत बराच काळ खूनखराबा केला होता. व्यावसायिकांनी तर १९९८ साली काळी दिवाळी साजरी केली होती. लेरिन्स बिष्णोईचा खुनखराबा जर थांबला नाही तर उद्या सिनेसृष्टीही रस्त्यावर येईल, असे बोलले जात आहे. लॉरेन्स बिष्णोई यास साबरमती कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे. अनमोल बिष्णोईला अमेरिकेने तडीपार (डिपोर्ट) केल्याने आता शुभम लोणकर देशाबाहेरून अंडरवर्ल्डची सूत्रे हलवत आहे. पुण्यातील आपल्या गँगला तो वापरत आहे. मुंबई ही आपल्या देशाची अर्थवाहिनी आहे. मुंबईत प्रचंड पैसा आहे. एका फोनवर पैसे घरी येतात असा लॉरेन्स बिष्णोईचा समज आहे. मुंबईतील बॉलीवूड सहजासहजी पैसे बाहेर काढत नाहीत. गुंडांना पैसे दिले तर धोका, नाही दिले तरीही धोका! पोलिसांना न कळविता गुंडांना खंडणी दिली तर बरेच व्यावसायिक अडचणीत येतात याची अनेक उदाहरणे देता येतील. पोलीस त्रास देणार, अशा द्विधा अवस्थेत बरेच जण असतात.
मुंबई पोलिसांनी एन्काऊंटरच्या जोरावर मुंबईतील गँगवॉर, अंडरवर्ल्ड संपविले, परंतु २०१० नंतर मुंबईत पोलिसांनी एकही चकमक घडविलेली नाही. लहान मुलांचे अपहरण करून त्यांना घाटकोपर येथील एका हॉलमध्ये डांबणाऱ्या रोहित आर्या या पुण्याच्या इसमाला घाटकोपर पोलिसांनी गेल्या वर्षी चकमकीत ठार मारून मुलांची सुटका केली. हा अपवाद वगळला मुंबईतील पोलिसांच्या चकमकी गेल्या पंधरा-सोळा वर्षांपासून थांबल्या आहेत. त्यामुळेच गुंडांचे फावले आहे. मरणाची गुंडांना अजिबात भीती राहिलेली नाही. जेलमध्ये गेल्यावर आपल्या मर्जीप्रमाणे हव्या त्या वस्तू त्यांना मिळतात. टोळीची बांधणी करता येते. लॉरेन्स बिष्णोईने पुण्यातील जेलमध्ये आपला मोठा गट तयार केला आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक शुभदीप सिंह ऊर्फ सिध्दू मुसेवाला याची हत्या करण्यासाठी लॉरेन्सने पुण्यातील पोरांचाच वापर केला होता. सिध्दू मुसेवाला याची हत्या करून लॉरेन्सची पोरं गुजरातला पळाली. लॉरेन्सने त्यांची गुजरातमधील भूजमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. बाबा सिद्दिकी व सलमानचे आरोपीही गुजरातमध्येच सापडले त्यामुळे लॉरेन्स बिष्णोईचे गुजरात कनेक्शन संशयास्पद वाटत आहे.
रोहित शेट्टीच्या टॉवरवर गोळीबार करणारे आरोपीही गुजरातमध्येच लपून बसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लॉरेन्स बिष्णोईकडे ७०० च्या वर पोरं आहेत. ही पोरं व्हाटसअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी समाज माध्यमांतून एकमेकांच्या संपर्कात असतात. गोळीबार केल्यानंतर ऑडिओ. व्हिडीओ अथवा मेसेज वायरल करून जबाबदारी घेतात. अशा या संघटित टोळीचा जर वेळीच बंदोबस्त झाला नाही तर भविष्यात मुंबईतील व्यावसायिकांना फिरणे मुश्कील होईल.
मुंबईत अरुण गवळीचा आतंक वाढला होता तेव्हा मुंबई पोलिसांनी दगडी चाळीत घुसून गवळीच्या मारले होते. त्यानंतर अरुण गवळी थंडावला अरुण समोरच त्याच्या घरात तीन गुंडांना चकमकीत ठार गवळीला तेव्हा सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद नव्हता. त्यामुळे तो संपला, परंतु लॅरिन्स लवकर संपणार नाही. त्याचा वापर संपला की त्याचा बाजार उठेल. सध्या तरी त्याला सत्ताधाऱ्यांचे अभय आहे.


























































