
1 आईवडिलांनी आपली संपत्ती मुलांच्या नावावर करायची असते. संपत्ती मुलांच्या नावावर करताना गिफ्ट डीड किंवा मृत्युपत्राचा वापर करणे कायदेशीररित्या योग्य मानले जाते.
2 स्वकष्टार्जित मालमत्ता कोणालाही देण्याचा वडिलांना पूर्ण अधिकार आहे, परंतु वडिलोपार्जित मालमत्तेत मुलींनाही मुलांइतकाच समान अधिकार असतो.?
3 नोंदणीपृत गिफ्ट डीडद्वारे मालमत्ता हस्तांतरित करणे हा एक प्रमुख कायदेशीर मार्ग आहे. हा मार्ग आयकरातून मुक्त असतो. हा मार्ग नातेवाईकांमध्ये केला जातो.
4 हस्तांतरण आणि देखभाल- मालमत्ता हस्तांतरित केल्यानंतर जर मुले आईवडिलांची काळजी घेत नसतील, तर न्यायालयाच्या निर्णयानुसार गिफ्ट डीड रद्द होते
5 मुलांच्या नावावर संपत्ती हस्तांतरित करण्यापूर्वी, त्याचा मुलांवर होणारा कर परिणाम आणि नंतरच्या व्यवस्थापनाबद्दल काळजीपूर्वक विचार करणे योग्य ठरते.





























































