
नवी दिल्लीत 16 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱया इंडिया एआय इम्पॅक्ट समीट 2026 ला जगभरातील दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये अमेरिकेतील गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, ओपनएआयचे सॅम ऑल्टमॅन आणि मेटाचे अलेक्झांडर वांग यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे. एन विडियाचे जेनसेन हुआंगसुद्धा या कार्यक्रमासाठी हिंदुस्थानात येत आहेत.
इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये जगातील सर्वात मोठे एआय पॉवर दिसणार आहे. दिल्लीतील भारत मंडपम येथ हा कार्यक्रम 20 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यावेळी जगातील दिग्गज लोकांसोबत हिंदुस्थानी बिझनेसमॅनच्या बैठकी पार पडणार आहेत. पाच दिवस चालणाऱया या कार्यक्रमात टेक धोरण ठरवणे, संशोधन, इंडस्ट्री यांसह विविध विषयावर चर्चा होईल. या कार्यक्रमासाठी 30 देशांतील 300 हून जास्त प्रतिनिधी पोहोचणार आहेत.
कोण कोण येणार?
सुंदर पिचाई (गुगल), जेनसेज हुआंग (एनविडिया), डारियो अमोदेई (एन्थ्रोपिक), अलेक्झांडर वांग (मेटा), क्रिस्टियानो अमोन (क्वॉल्कॉम), निकेश अरोरा (पालो अल्टो नेटवर्क), शांतनु नारायण (अडोब), सॅम ऑल्टमॅन (ओपनएआय), मुकेश अंबानी (रिलायन्स इंडस्ट्रीज), सुनील भारती मित्तल (भारती इंटरप्रायझेस), के. कृतिवासन (टीसीएस), नंदन निलेकणी (इन्फोसिस), एन. चंद्रशेखरन (टाटा ग्रुप).




























































