पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि संसदेला बॉम्बने उडकण्याची धमकी मिळाली आहे. मोहालीतील 10 शाळांना पाठवलेल्या धमकीच्या ई-मेलमध्ये तसा उल्लेख करण्यात आला आहे.

माहिती मिळताच संबंधित शाळा व्यवस्थापन सतर्क झाले आणि खबरदारी म्हणून सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली. यासंदर्भात पालकांना मेसेज पाठवून माहिती देण्यात आली. तसेच, सकाळी शाळेत पोहोचलेल्या अनेक मुलांना गेटवरूनच परत पाठवण्यात आले. धमकीची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. डीएसपी सिटी हरसिमरन बल स्वत: लर्निंग पाथ शाळेत पोहोचले. तर डीएसपी सिटी कन पृथ्वी चहल पॅरागन शाळेत पोहोचले. पोलिसांनी सर्व शाळा सील केल्या.

डीईओ गिन्नी दुग्गल यांनी सांगितले की, 10 शाळांना धमकी मिळाली आहे. यामध्ये पॅरागन, लर्निंग पाथ, माईंड ड्री, जीडी गोयंका, विवेक स्कूल, इंडस आणि इतर शाळांचा समावेश आहे. ज्या शाळांना धमकी मिळाली आहे, त्या बंद करण्यात आल्या आहेत. तसेच, सरकारी शाळांना त्यांचे ई-मेल तपासण्यास सांगितले आहे. या प्रकरणाशी संबंधित माहिती डीसींना पाठवण्यात आली आहे.