केवळ आई आहे म्हणून शिक्षण रोखू नका! मुलाला घेऊन अमेरिकेत जाण्यासाठी हायकोर्टाची महिलेला परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केवळ ती आई आहे म्हणून कोणत्याही महिलेच्या तिच्या शिक्षणापासून किंवा प्रगतीपासून रोखता येणार आहे.  कोणत्याही आईला तिची मुलं आणि करिअर यापैकी एक निवडण्यावर दबाव टाकला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट मत दिल्ली हायकोर्टाने नोंदवले.

लहान मुलाला घेऊन अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी एका घटस्फोटीत महिलेने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. महिलेचा पतीसोबत घटस्फोट झालेला आहे. कौटुंबिक न्यायालयाने मुलाच्या पित्याला प्रत्येक महिन्यातील तीन रविवारी आणि मुलाच्या वाढदिवसाला मुलाला भेटायची परवानगी दिलेली आहे. याच दरम्यान  मुलाची आई अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेली. त्यानंतर तिने मुलाला आपल्यासोबत नेण्यासाठी परवानगी मिळावी, म्हणून  दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली. यावर सुनावणी करताना हायकोर्टाने तिला ही परवानगी दिली. आई ही मुलाची मुख्य पालनकर्ता असते असे मानले जाते. तरीही हा तर्क आईचे शिक्षण, आत्मविकास आणि पुढे जाण्याचा अधिकार सोडायचे कारण बनू शकत नाही.

हायकोर्ट म्हणाले आई होणे कोणत्याही महिलेच्या प्रगतीत अडथळा बनू शकत नाही. उलट महिलेला शिक्षण घेणे, पुढे जाणे आणि आपली स्वप्नं पूर्ण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणत्याही आईला आपली मुलं आणि करिअर यापैकी एक निवडण्यावर दबाव टाकला जाऊ शत नाही. मुलाच्या ताब्या संदर्भातील प्रकरणात या बाबीचा खास विचार केला पाहिजे.

कोर्टाने स्पष्ट केले की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्याचा अधिकार आहे. आई असल्यामुळे तिने आपली स्वप्ने आणि करिअर सोडून द्यावे अशी अपेक्षा महिलेकडून केली जाऊ ये.