अल्पवयीन मुलीवरील अत्याचार; आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

२०१९ मध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कल्याणच्या जिल्हा न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण असा निकाल आज दिला आहे. हनुमंत उर्फ बाळू उबाळे (२९) असे आरोपीचे नाव असून न्यायालयाने तब्बल सात वर्षांनंतर पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय दिला.

मानपाडा पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून साक्षी-पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि इतर महत्त्वाचे पुरावे गोळा केले. तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.ए. पत्रावळे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर करण्यात आलेल्या पुराव्यांचा सखोल विचार करून आरोपीला आज दोषी ठरवले. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार या सर्व शिक्षा आरोपीला एकत्रितपणे भोगाव्या लागणार आहेत.