Ratnagiri News – महाराष्ट्रातील पहिल्या ग्रामीण,कृषी आणि सहकार मराठी साहित्य संमेलनाला पालवण मध्ये दिमाखात प्रारंभ, वाजत गाजत निघाली ग्रंथदिडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था आयोजित शासन पुरस्कृत राज्यस्तरीय ग्रामीण,कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाला आज सायंकाळी दिमाखात प्रारंभ झाला.ध्वजारोहण केल्यानंतर ढोलताशांचा गजरात वाजत-गाजत ग्रंथदिडी काढण्यात आली.यावेळी कोकणातील पारंपरिक पालखीनृत्य करण्यात आले.
ग्रामीण,कृषी आणि सहकार मराठी साहित्य संमेलनाच्या ध्वजारोहणाप्रसंगी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक आणि सहकार तज्ज्ञ डॉ. तानाजीराव चोरगे, आमदार शेखर निकम, स्वागताध्यक्ष संजय भावे, ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, अरूण इंगवले उपस्थित होते.साहित्य संमेलनातची ग्रॅथदिंडी वाजतगाजत संमेलनाच्या स्थळी आली. त्यानंतर ग्रंथ प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. सायंकाळी स्थानिक कवींचे काव्य संमेलन रंगले होते.
साहित्य संमेलनाचे  उद्घाटन १४ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. मांडकी -पालवण येथे साहित्य संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता ग्रामीण साहित्यातील कोकण याविषयावर परिसंवाद होणार आहे. याचबरोबरीने इतर कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.