
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची पेंद्रीय तपास संस्थांकडून चौकशी केली जावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली होती. त्यानंतर पेंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी एअरक्राफ्ट ऑक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून (एएआयबी) या अपघाताची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
विमान दुर्घटनेसंदर्भात चौकशीसाठी स्वतंत्र संस्था असावी म्हणून एएआयबीची स्थापना प्रफुल्ल पटेल हे नागरी उड्डाण मंत्री असताना करण्यात आली होती. एएआयबी संस्था जगातील कोणत्याही संस्थेची मदत चौकशीकामी घेऊ शकते अशी तरतूद आहे. अजितदादांच्या विमान अपघाताची आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांकडूनही चौकशी झाली पाहिजे, असा आग्रह रोहित पवार यांनी मुंबई आणि नवी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत धरला होता.




























































