
मुलुंड पश्चिम परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलुंड पश्चिमेकडील बांधकामादरम्यान मेट्रोच्या पिलरचा काही भाग अचानक कोसळला आणि तो खाली जाणाऱ्या रिक्षावर कोसळला. या भीषण अपघातात एकजण छा रिक्षामधील तीन ते चार प्रवासी जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना आज दुपारी 12 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास घडली असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, मेट्रो प्राधिकरणाचे कर्मचारी, वॉर्ड स्टाफ आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून परिसराला वेढा घातला असून येथील वाहतूक दुसऱ्या मार्गावर वळवण्यात आली आहे.
View this post on Instagram
हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे. विशेषतः मेट्रो बांधकामादरम्यान सुरक्षा मानकांचे गांभीर्याने पालन करण्यात आले होते का, यावर सध्या तपास सुरु करण्यात आला आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
410मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार सहा फुटांचा पिलर ऑटोरिक्षा आणि स्कोडा कारवर पडला. अपघातात जखमी झालेल्यांना मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्याकत आले. यापैकी रामधन यादव यांना मृत घोषित केले. राजकुमार इंद्रजीत यादव (45) हे गंभीर जखमी झाले. आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. तर महेंद्र प्रताप यादव(52) आणि दीपा रुहीया (40) यांच्यावर उपचार सुरु आहे.
या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले आहे. शिवाय दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियाना 5 लाख आर्थिक मदत राज्य सरकारने घोषित केले आहे. तसेच जखमींच्या उपचाराच्या सर्व खर्च राज्य सरकार करेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे.


























































