IND Vs PAK – हिंदुस्थान पाकिस्तानला धुळ चारणार? चामिंडा वासने सांगितली फायनलमध्ये भिडणाऱ्या संघांची नावं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

T20 World Cup 2026 मध्ये रंगतदार लढती पाहायला मिळत आहेत. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये दोन सुपर ओव्हरचा थरार रंगला. झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला मोठा हादरा देत त्यांना पराभवाची धुळ चारली. आता चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत, त्या 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यावर. श्रीलंकेचा दिग्गज माजी खेळाडू चामिंडा वासने सुद्धा या सामन्याच्या निकालावर भाष्य केलं आहे. तसेच कोणते खेळाडू मॅच विनर ठरतील, कोणते संघ अंतिम फेरीत धडक मारतील याचं भाकीतही त्याने वर्तवलं आहे.

चामिंडा वासने NDTV ला दिलेल्या मुलाखतीमध्ये हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यावर भाष्य केलं आहे. जो संघ दबावावर नियंत्रन ठेऊन उत्तम खेळ, करेल तोच संघ जिंकण्यात यशस्वी होईल, असं तो म्हणाला आहे. तसेच हिंदुस्थानला जर सामन्यावर पकड निर्माण करायची असेल तर, त्यांना बाबर आझम आणि शाहीन शहा अफरीदी यांच्यावर दबाव टाकला पाहिजे. तसेच विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा, कर्णधार सूर्यकुमार यादव, अष्टपैलू हार्दिक पंड्या, संजू सॅमसन आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सर्व खेळाडूंना चामिंडा वासने गेमचेंजर मानलं असून या खेळाडूंमध्ये सामना फिरवण्याची क्षमता असल्याच तो म्हणाला आहे. तसेच हिंदुस्थानची मुख्य ताकद म्हणजे संघात वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये सामना जिंकवणाऱ्या खेळाडूंचा भरणा आहे.

ICC T20 WC 2026 – हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यावर पाऊसहल्ल्याची शक्यता

यावेळी चामिंडा वासला टी20 वर्ल्ड कप 2026 ची अंतिम लढत कोणत्या संघांमध्ये होईल, अशी विचारणा करण्यात आली तेव्हा त्याने हिंदुस्थान आणि न्यूझीलंड या दोन देशांची नावं घेतली. त्याच्या मते दोन्ही संघ संतुलित आहेत, तसेच बाद फेरीतील दबावाशी जुळवून घेण्याची दोन्ही संघांची क्षमता आहे. त्यामुळे हिंदुस्थान आणि न्यूझीलंड या संघांमध्ये फायनलची लढत होईल, असं भाकीत चामिंडा वासने केलं आहे.